वनौषधी

01/04/2009

 दवाखाने नसल्याने बहुतेक लोक हे आयुर्वेदिक औषधांचा वापर करीत त्याप्रमाणे  जंगलात डोंगर-दऱ्यात राहणारे आदिवासी लोक हे वन औषधी वनस्पतींबरोबरच अवलंबून असायचे. आजार झाल्यास औषधी वनस्पतींचा वापर करुन आजारपणापासून मुक्त होत असतात. ग्रामीण भागातील आदिवासींच्या जीवनात आजही वनऔषधी वनस्पतींचा  वापर करण्यात येतो. 

 कोड ः-

या वनस्पतीचा दमा या आजारावर उपयोग केला जातो. याच्या  शेंगा सोलून त्याच्यातील दाणे काढणे व ते कुटून त्याचे चूर्ण बनवून दमा झालेल्या व्यक्तीला पाण्यात विरघळून पिण्यास देणे म्हणजे रोगी बरा होते.

 

 एरंड, केळी, रानेभेंडी, गुंज ः-

या सर्व वनस्पतींचा एकत्र उपचार परम्हा या रोगावर केला जातो. वरील सर्व झाडांची मुळे काढून त्यांचे चूर्ण बनवून पाण्यात विरघळून पिण्यात विरघळून पिण्यास देणे. म्हणजे रोगी बरा होतो.

 

3) फटांगरा ः-

या वनस्पतीचा उपयोग सर्प दंशावर केला जातो. या झाडाचे मूळ काढून ते कुटायचे व त्याचे चूर्ण पाण्यात विरघळून ते पिण्यास देणे. त्यामुळे विष उतरते.

 

 खरबाट, उंबर, करकांगवण ः-

या वनस्पतींचा पोटदुःखी या आजारावर उपयोग केला जातो. खरबाट या झाडाचे मूळ, उंबराची साल, करकांगवण एकत्र करुन कुढणे व त्याचे चूर्ण पाण्यात विरघळून पिण्यास देणे.

 

हिरडा, बोर ः-

या वनस्पतींचा खोकला या आजारवर उपयोग होतो. हिरडीचे कफ, बोरीची साल एकत्र करुन कुटणे व चूर्ण पाण्यात विरघळवून पिण्यास टदेणे.

 

फांगुळटा, तरवट, खराटा, निरगुड ः-

या सर्व वनस्पतींचा उपयोग विंचू चावल्यावर त्याचे विष उतरवणे यासाठी केला जातो. खराट्याचा पाला, फांगुळट्याचा पाला, निरगुडीचा पाला, निरगुडीचा पाला चुरणे व जखमेवर दाबणे यामुळे विष उतरायला मदत होते.

 

बखेल, बिबला ः-

या वनस्पतींचा उपयोग थेंब थेंब लघवी होणे म्हणजे तिडक्या परम्हा  या रोगावर होतो. या वनस्पतींची साल काढून कुठणे व पाण्यात विरघळून पिण्यास देणे, त्यामुळे रोगी बरा होतो.

 

गोगबल ः-

या वनस्पतीचा उपयोग गर्मी या आजारावर केला जातो. ही वेल कुटून चूर्ण पाण्यात विरघळून पिण्यास देणे. गर्मी कमी होते.

 

कडूनिंब, निरगुड ः-

या वनस्पतींचा उपयोग सांधेदुखी या रोगावर केला जातो. या झाडाचा पाला गरम पाण्यात टाकून शेक  देणे. त्यामुळे सांधे दुःखणे थांबते.

 

बिबला ः-

या वनस्पतींचा उपयोग आष पडणे. या रोगावर केला जातो. या झाडाची साल काढून विस्तवावर गरम करणे नंतर थंड करुन व त्याचे चुर्ण करुन पाण्यात पिण्यास देणे. त्यामुळे आव थांबते.

 

रानसेटोल ः- 

या वनस्पतीचा उपयोग पोटात गोळा उठणे या आजारावर केला जातो. या झाडांचा कंद काढून ज्याठिकाणी गोळा उठतो. त्याठिकाणी शेक देणे.

 

 अळण ः- 

 या वनस्पतींचा उपयोग डोके दुखी या आजारावर केला जातो. या झाडाचा पाला आणणे व कुटून तो नाकात टाकणे. म्हणजे डोकेदुखी थांबते.

 पळस, करवंद, तिवस, बरवडा, एरंड, केळ, तोंडवळ, उंबर, बोर ः-

वरील सर्व वनस्पतींचा एकत्र उपयोग लघवी बदलणे या आजारावर केला जातो. या सर्व वनस्पतींची मूळ काढून त्यांचे मिश्रण करुन कुटणे व पाण्यात विरघळून पिण्यास देणे.

 

 गोमेठ ः- 

या वेलीचा उपयोग भूक न लागणे यासाठी केला जातो. या वनस्पतीचे मूळ काढून खाण्यास देणे म्हणजे भूक वाढते.

 

बांबू ः-

या वनस्पतीमध्ये कासटण मानेल या दोन्ही बांबूचा उपयोग नाकबूट या रोगावर केला जातो. यामध्ये बांबूची निळवट घासुन काढणे व हळद टाकणे. वाकीची फुले फोडून कोंडी कुटणे व त्याचे मिश्रण करुन खायला देणे किंवा तांदळाची भाकरी बनवून पानावर भाजणे न पलटता भाजणे व खायला देणे. म्हणजे रोगी बरा होतो.

 

बोस, खरबाट ः- 

या वनस्पतींचा उपयोग इच्छा न होणे या आजारावर केला जातो. या वनस्पती एकत्र कुटणे व त्यांचा चिकटा पिण्यास देणे. म्हणजे आजार बरा होतो.

 

 बोर ः-

या झाडाचा उपयोग विंचू चावल्यावर त्याचे विष उतरविण्यासाठी केला जातो. या वनस्पतीचा कोवळा कोंब चुरणे व विंचू चावलेल्या ठिकाणी जखमेवर थोडावेळ दाबून ठेवणे. विष उतरण्यास मदत होते.

 

 तुळस ः- 

खोकला, कान फुटणे, डोके दुःखी, सर्दी अशा अनेक रोगांवर वरील  वनस्पतींचा उपयोग केला जातो. तुळशीची पाने धुवून चावून खाणे किंवा पानांचा रस काढून पिणे. त्यामुळे वरील रोगांपासून आराम मिळतो.

 

कडूनिंब ः- 

या वनस्पतीचा पित्तनाशक, खडा या रोगांवर उपयोग केला जातो. कडुनिंबाचा पाला आणून त्याचा रस काढून पिल्यास पित्ताचा नाश होतो. त्याचप्रमाणे रस काढून अंगाला लावल्यास खडा रोगापासून सुटका मिळते.

 

 कोरफड ः-

या वनस्पतीचा भाजल्यावर उपयोग केला जातो. कोरफडीचा उपयोग भाजलेल्या ठिकाणी लेप लावल्यास जखम बरी होती.

 

आघाडा ः-

या झाडाचे मूळ ताकामध्ये बाजूने पिण्यास दिल्याने रोगापासून आराम मिळतो.

 

एरंड ः-

या वनस्पतीचा कावीळ या रोगावर उपयोग होतो. या झाडाची पाने दूधातून रोज सकाळी दिल्यास हा रोग बरा होतो.

 

वंद्यागवत, साम्या आग्या, बांबू ः-

या वनस्पतींचा कुष्ठरोगावर उपयोग केला जातो. बांबुचे पाचकट  जाळणे, वंद्यागतवत , साम्या आग्या एकत्र करुन रोगाच्या ठिकाणी लावणे. खरवतीच्या पानाने डाग बसणे व दुःखावर पाला पिळणे. त्यानंतर जखमेवर जाळलेली मस लावणे. गाठमुळ कुटून वाडी सारखे 

नवून पिण्यास देणे. हा रोग त्यामुळे बरा होतो. 

 

ईशप ः-

जंगलात दगडाला ईशप राहते. त्याचा या रोगावर उपयोग होतो. याची मस करुन दुःखाण्या ठिकाणी लावणे. म्हणजे ईशप बरे होते.

 

कटांगरा, कसांगरी, करकांगवण ः-

या वनस्पतींचा सर्पदंशावर उपयोग केला जातो. या झांडाचा पाला एकत्र मिसळून फुटणे व पाण्यात मिसळवून पिण्यास देणे.

 

उंबर, जांभूळ, मधळ ः-

 या वनस्पतींचा हगवण या आजारावर उपयोग केला जातो. वरील झाडांचे साल हाताच्या बोटाने मिसळणे व आणून कुटणे व एक चुन्याचा ग्लास पाणी घेवून त्यात चुर्ण टाकून पिण्यास देणे

 

काविळ, कावळआंबा, बिबला, बश्येलः-

या वनस्पतींचा उपयोग काविळ रोगावर केला जातो. कावळीचे मुळ, कावळआंब्याचे मूळ, बिबल्याची साल, बश्येलीचे मूळ, सर्व एकत्र करुन कुटणे व पाण्यात विरघळून पिण्यास देणे. यामुळे वरील रोग बरा होतो.

 

 मधळः-

या वनस्पतीचा उपयोग दुध वाढविण्यासाठी केला जातो.  या झाडाचा पाला पाण्यात पिळून पाणी पिण्यास दिल्याने दूध वाढते.

 

 शंभर झाडेः-

जंगलातील शंभर झाडांची मुळे आणून ती कुटून मिश्रण करुन पाण्यातून पिण्यास देणे. आजार बरा होण्यास मदत होते.

 

झाडीवेल, थेलीथंडी, कावळआंबा, येल्याकरंज, खेहिडा, करवंद ः-

या वनस्पतींचा उपयोग आग रोगावर केला जातो. झाडीवेलीचा पाला, थेडीथेलीचा पाला, कावळ आंबा, येल्या करंज व कडू करवंदीचे रोहिड्याची साल कुटून एका खासेमध्ये त्या रोग्याला वाफ दिल्यास सदरचा रोग बरा होतो.

 

चांदीवा, रानभेंडी सादड ः- 

या वनस्पतींचा उपयोग शरीरावर कुठेही झालेल्या जखमेवर केला जातो. चांदण्याचा चिक, रानभेंडीचे मूळ, सादडीची साल एकत्र कुटून चांदवीच्या चिकात मिश्रण करुन जखमेवर लावल्यास  जखम बरी होते.

पारंपारिक वापरातील हे सारे इलाज केले जातात. तरीही आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

 

-दामु कमा कुवरा

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: